
जर तुम्हाला विज्ञानकथांची आवड असेल, तर आज आम्ही तुम्हाला टॉपच्या सहा सायन्स फिक्शन चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत, जे तुम्ही घरबसल्या बघू शकता.
'द प्लॅटफॉर्म' या चित्रपटात तुरुंगात राहणाऱ्यांची कथा दाखवण्यात आली आहे. या तुरुंगात लोकांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वात वरच्या स्तरातील लोकांना प्रथम अन्न दिले जाते. मग, त्यांच्या ताटात जे काही उरते ते इतर स्तरातील लोकांना दिले जाते. तिथून काही उष्ट उरलं तर, ते सगळ्यात खालच्या स्तरातील लोकांपर्यंत पोहोचतं.
जर, तुम्हाला सायन्स फिक्शनचे वेड असेल तर, तुम्हाला 'द मेट्रिक' हा चित्रपट खूप आवडेल. हा चित्रपट खूप प्रसिद्ध असून, आतापर्यंत या चित्रपटाचे चार भाग आले आहेत.
स्टीव्हन स्पीलबर्गचा 'रेडी प्लेयर वन' हा चित्रपट विज्ञानकथा प्रेमींसाठी देखील एक चांगला पर्याय आहे. या चित्रपटाची कथा २०४५मध्ये घडत आहे.
'द अॅडम प्रोजेक्ट' या चित्रपटाची कथा एका टाइम ट्रॅव्हलरभोवती फिरते, जो भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन शॉन लेव्ही यांनी केले होते.
दिग्दर्शक निक मॅथ्यूचा 'स्पेक्ट्रल' हा चित्रपट अतिशय वेगळ्या प्रकारचा सायन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा स्पेशल ऑप्सभोवती फिरते.




