मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Releases: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ते ‘क्रू’; पाहा या आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर काय काय बघता येणार?

OTT Releases: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ते ‘क्रू’; पाहा या आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर काय काय बघता येणार?

May 22, 2024 11:58 AM IST
  • twitter
  • twitter
OTT Releases This Week: या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या यादीत हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांचीही नावे आहेत.
मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तुम्हाला भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या यादीत हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांचीही नावे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोणती चित्रपट-वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार आहे? नवीन चित्रपट आणि वेब सीरिजची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजवर एक नजर टाकूया…
share
(1 / 6)

२९ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्रू'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. आता हा चित्रपट ओटीटीवरही धमाल करायला सज्ज झाला आहे. करीना, तब्बू आणि क्रिती सोबतच या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा देखील आहेत. २४मे पासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.
share
(2 / 6)

तुम्ही चित्रपटगृहांमध्ये जाऊन 'एक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडम' पाहिला नसेल, तर आता तुम्ही तो घरबसल्या जिओ सिनेमावर पाहू शकता. तुम्ही तुमच्या वॉच लिस्टमध्ये तुम्ही या पॉवरफुल हॉलिवूड चित्रपटाचा नक्कीच समावेश करा.
share
(3 / 6)

'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाची कथा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाद्वारे रणदीप हुडाने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याने अतिशय अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले. २८ मेपासून हा चित्रपट ‘झी५’वर रिलीज होणार आहे.
share
(4 / 6)

'डून' हा चित्रपट  २०२१साली रिलीज झाला होता, त्यानंतर त्याच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये पॉल आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेताना दिसणार आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट २१ मेपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर पाहू शकता.
share
(5 / 6)

कोर्टनी आणि ख्लो नावाच्या दोन बहिणींची कथा 'द कार्दशियन्स'मध्ये दाखवण्यात आली आहे. या सीरिजची कथा त्यांच्या आयुष्याभोवती फिरते. दोघींची लाइफस्टाइल एकदम हाय प्रोफाईल आहे, पण त्यामागची कथा नेमकी काय आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज पाहावी लागेल.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज