मे महिना अर्थात सुट्टीचा महिना आता संपणार आहे. या महिन्याची सुरुवात ओटीटीवर आलेल्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' सारख्या धमाकेदार सीरिजने झाली होती. यासोबतच हॉलिवूड आणि साऊथच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक चांगले चित्रपट आणि सीरिजही प्रदर्शित झाल्या आहेत. आता या आठवड्यात 'पंचायत ३' ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज आहेत. चला पाहूया यादी...
पंचायत ३: अभिषेक त्रिपाठी या अभियांत्रिकी पदवीधराची कथा ‘पंचायत’मध्ये दाखवण्यात आली आहे, जो उत्तर प्रदेशातील ‘फुलेरा’ या दुर्गम गावात नोकरीच्या चांगल्या पर्यायांच्या अभावामुळे पंचायत सचिव बनतो. या शोमध्ये सचिव म्हणून जितेंद्र कुमार दिसला असून, रघुबीर यादव, मीना गुप्ता, सान्विका, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैजल मलिक आणि सुनीता राजवर यांच्या प्रमुख भूमिका आहे. ‘पंचायत’चा सीझन ३ हा येत्या २८ मे रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
इल्लिगल: ‘इल्लिगल ३’ हा एक कोर्टरूम ड्रामा असून, नेहा शर्मा आणि अक्षय ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका या सीरिजमध्ये आहेत. ही सीरिज २९ मे रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.
द फर्स्ट ओमन: ‘द फर्स्ट ओमन’ या चित्रपटाची कथा एका अमेरिकन महिलेभोवती फिरते, जिला रोममधील एका चर्चमध्ये काम करण्यासाठी पाठवले जाते. परंतु, जेव्हा ती अँटिख्रिस्तसजा जन्म घडवून आणण्याची वाईट योजना उघड करते, तेव्हा या कथेत एक वेगळे वळण येतं. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर ३०मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
स्वातंत्र्य वीर सावरकर: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट २८ मे रोजी ‘झी५’ प्रदर्शित होणार आहे. वीर सावरकर एक राजकारणी कार्यकर्ते स्वतंत्र लढ्यातील मुख्य भूमिका बजावणारे आणि लेखक, असे व्यक्तिमत्व होते. हिंदुराष्ट्रवादी राजकीय विचारसरणीचे अग्रगण्य प्रवर्तक होते. या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे.