मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Releases: नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०'मध्ये आहेत या ४ भारतीय वेब सीरिज! तुम्ही पाहिल्यात का?

OTT Releases: नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०'मध्ये आहेत या ४ भारतीय वेब सीरिज! तुम्ही पाहिल्यात का?

Jul 03, 2024 06:49 PM IST
  • twitter
  • twitter
Netflix Top Indian Web Series: नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०’ वेब सीरिजमध्ये ४ भारतीय वेब सीरिज्सनी बाजी मारली आहे. सध्या सगळीकडेच या सीरिजचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोजच काहीना काही नवा कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येतो. जगभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज बघण्यासाठी नेटफ्लिक्स हा लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म  बनला आहे. नुकतेच नेटफ्लिक्सने टॉप १० वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. यात ४ भारतीय वेब सीरिजचा समावेश आहे. पाहा कोणत्या आहेत या वेब सीरिज…
share
(1 / 5)

'कोटा फॅक्टरी'चा तिसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे. या सीरिजची देशभरात चर्चा रंगली होती. या सीरिजची क्रेझ अजून कमी झालेली नाही. 'कोटा फॅक्टरी' सध्या भारतातील नेटफ्लिक्सवरील ‘टॉप १०’ यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. जीतू भैय्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा मोठा भाऊ बनून त्यांचे प्रश्न कसे सोडवतात हे पाहण्यासारखे आहे. या सीरिजमध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे.
share
(2 / 5)

'द ग्रेट इंडियन कपिल शो' आता संपला आहे. तरीही, चाहत्यांना हा शो इतका आवडला आहे की सध्या ही या शोची सीरिज नेटफ्लिक्सवरील टॉप १० यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. देशालाच नाही तर, अवघ्या जगाला कपिलची कॉमेडी आवडली आहे. जोपर्यंत या शोचा दुसरा सीझन येत नाही, तोपर्यंत तुम्ही हा पहिला सीझन पाहून तुमचे मनोरंजन करू शकता.
share
(3 / 5)

बदला, फसवणूक, दमदार संवाद आणि प्रेमकथा यासोबतच देशभक्तीची भावना असणारी गणिकांची कथा सांगणारी ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज जर तुम्ही पाहिली नसेल, तर आजच बघा. संजय लीला भन्साळी यांनी या सीरिजमध्ये बरीच गुंतवणूक केली आहे. भव्य सेट, दमदार काहाणी आणि दिग्गज कलाकारांचा अभिनय अशा सगळ्याच बाजूंनी ही सीरिज कमाल झाली आहे. ही सीरिज सध्या पाचव्या स्थानावर आहे.
share
(4 / 5)

अभिनेता रवि किशनचा उत्कृष्ट अभिनय पाहायचा असेल, तर ‘मामला लीगल है’ ही सीरिज बघायलाच हवी. ही  सीरिज निव्वळ मनोरंजन आहे. वकिली क्षेत्रातले छक्केपंजे या सीरिजमध्ये पाहायला मिळतात. जर, तुम्ही ही सीरिज अजून पाहिली नसेल, तर आजच पहा. कारण, ती टॉप १०च्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज