या आठवड्यात ओटीटीवर काय बघायचे या विचारात असाल, तर नेटफ्लिक्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. ओटीटीवर प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर सध्या अनेक शो ट्रेंड करत आहेत. चला तर मग, जाणून घेऊया या प्लॅटफॉर्मवरील टॉप ५ शोबद्दल ज्यांना भारतातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्याच्या टॉप शोमध्ये काही भारतीय टीव्ही शोजसोबतच अमेरिकन आणि कोरियन शोचीही नावे यादीत सामील झाली आहेत.
या यादीत पहिले नाव आहे, ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरचा सेलिब्रिटी गेस्ट शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'. कपिलचा हा शो ‘टॉप ५’ यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. प्रत्येक नवीन भागासोबत या शोला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. कपिल शर्मा आणि रणबीर कपूरसोबतच्या पहिल्या एपिसोडला खूप व्ह्यूज मिळाले आहेत. आता प्रत्येक नवीन एपिसोडसोबत या शोसाठी लोकांची क्रेझ पाहण्यासारखी असणार आहे.
साय-फाय टीव्ही शो '३ बॉडी प्रॉब्लेम' या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या अमेरिकन सायन्स फिक्शन शोला भारतातही प्रचंड फॉलोअर्स आहेत. यामुळेच ‘टॉप ५’ टीव्ही शोच्या यादीत ही सीरिज दुसऱ्या क्रमांकावर आहे. IMDbवर या शोला १० पैकी ८ रेटिंग मिळाले आहे.
या यादीत तिसरे नाव आहे रवि किशन स्टारर टीव्ही शो 'मामला लीगल है'. जर, तुम्हाला काहीतरी हलकेफुलके आणि मजेदार पाहायचे असेल, तर हा कार्यक्रम तुमच्यासाठी या आठवड्यात परफेक्ट ऑप्शन ठरेल.
‘टॉप ५’ शोच्या यादीत समाविष्ट असलेल्या चौथ्या शोबद्दल बोलायचे तर, ‘टेस्टामेंट: द स्टोरी ऑफ मोसेस’ टीव्ही शो आहे. या शोला IMDb वर ६.६ रेटिंग मिळाले आहे आणि एका इस्रायली राजपुत्राची कथा सांगणारी ही मालिका भारतातही लोकांच्या पसंतीस उतरली आहे.