अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा २' या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगली कामगिरी केली आणि कलेक्शनच्या बाबतीतही अनेक विक्रम केले. या चित्रपटाने इतरही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. यासोबतच 'हे' ६ चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहेत.
भूल भुलैया ३ : थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, 'भूल भुलैया ३' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. या चित्रपटाला भरपूर प्रेम मिळत आहे.
वेनम द लास्ट डान्स : जर तुम्हाला हॉरर चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर तुम्ही नेटफ्लिक्सवर 'वेनम द लास्ट डान्स' हा हॉलिवूड चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट इतका अप्रतिम आहे की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तो आवडला आहे. म्हणूनच नेटफ्लिक्सवर तो ट्रेंड करत आहे.
बॅक इन ॲक्शन : हॉलिवूड चित्रपट 'बॅक इन ॲक्शन'नेही नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला आहे. नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की, हा चित्रपट एक ॲक्शन चित्रपट आहे. ओटीटीवर तिसऱ्या क्रमांकावर 'बॅक इन ॲक्शन' ट्रेंड करत आहे.
मिशन इम्पॉसिबल : हॉलिवूड चित्रपटांची लोकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. ॲक्शन असो की फिक्शन, या सगळ्यांची मजा वेगळीच असते. जर, तुम्हाला ॲक्शन आणि थ्रिलरने भरलेला चित्रपट पाहायचा असेल, तर तुम्ही 'मिशन इम्पॉसिबल' पाहू शकता.
पुष्पा २ : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत रिलीज होताच अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने ओटीटीवरही एक नवा विक्रम केला आहे. अवघ्या २४ तासांत हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि भारतात सर्वाधिक ट्रेंड करत आहे.
लकी भास्कर : 'लकी भास्कर' ही एका अशा मुलाची कथा आहे, जो गरिबीतून बाहेर पडण्यासाठी चुकीच्या मार्गावर निघतो. पण पत्नी आणि वडिलांच्या योग्य मार्गदर्शनाने तो पुन्हा योग्य मार्गावर येतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे.