या आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत घरबसल्या तुम्ही काही चित्रपट पाहू शकता. यामध्ये कोणत्या चित्रपटांचा समावेश होतो चला जाणून घेऊया…
संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही वेब सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज १९४० सालामधील वैश्या व्यवसायवर आधारित आहे. या सीरिजमध्ये रिचा चड्ढा, शेखर सुमन, आदिती राव हैदरी, मनीषा कोयराला, सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहेत. १ मे रोजी सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.
अजय देवगण, ज्योतिका आणि माधवन अभिनीत 'शैतान' हा चित्रपट ४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
द ब्रोकन न्यूज सीझन २: सोनाली बेंद्रे आणि श्रिया पिळगावकर यांची ही सीरिज ३ मे रोजी प्रदर्शित झाली आहे.