ऑक्टोबरचा पहिला आठवडा धमाकेदार असणार आहे. या आठवड्यात (३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान) एक-दोन नव्हे तर सात वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर टक्कर देणार आहेत.
विजय थलापती याचा चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) ओटीटीवर लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, ‘गोट’ ३ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.
अनन्या पांडेचा आगामी चित्रपट 'Ctrl' ४ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दाखल होणार आहे. या चित्रपटात एआयची ताकद दाखवण्यात आली आहे.
'द ट्राइब' हा इंफ्लूएन्सरवर आधारित चित्रपट ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट Amazon Prime Videoवर रिलीज होईल. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे.
'मानवत मर्डर्स’ ही सीरिज ४ ऑक्टोबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. ही क्राईम थ्रिलर सीरिज आहे.
थ्रिलर आणि हॉरर प्रेमींसाठी 'सलेम्स लॉट' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा शो ३ ऑक्टोबरला मॅक्स नावाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'अमर प्रेम की प्रेम कहानी' हा चित्रपट ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता. या चित्रपटात आदित्य सील, सनी सिंह, सॅमी जोनास हेनी आणि प्रनूतन बहल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.