या आठवड्यात (१३ जानेवारी ते १९ जानेवारी) ओटीटीवर अनेक सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.
नेटफ्लिक्सची आगामी डॉक्यू सीरिज 'द रोशन्स' १७ जानेवारी रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या माहितीपटात रोशन कुटुंबाच्या तीन पिढ्यांचा इतिहास सांगितला जाणार आहे.
'पॉवर ऑफ फाइव्ह' हा सुपरहिरो शोही १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर येणार आहे. आदित्य राज अरोरा, जयवीर जुनेजा, बियांका अरोरा, यश सहगल, उर्वशी ढोलकिया, बरखा बिश्त यांच्यासह अनेक कलाकार या शोमध्ये दिसणार आहेत.
'पाताल लोक' या क्राईम ड्रामा मालिकेचा दुसरा सीझन १७ जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. यात जयदीप अहलावत, इश्वाक सिंग आणि गुल पनाग सारखे प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत.
अभिषेक बच्चनचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट १७ जानेवारीपासून ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत जॉनी लिव्हर आणि अहिल्या बमरू मुख्य भूमिकेत आहेत.
जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर आणि भूमिका मीना यांची 'चिडिया उड' ही वेब सीरिज ओटीटीवर धडकणार आहे. ही सीरिज एमएक्स प्लेयरवर १५ जानेवारी २०२५ रोजी रिलीज होईल.