ओटीटी प्रेमींसाठी डिसेंबरचा चौथा आठवडा धमाकेदार असणार आहे. या आठवड्यात काही बहुप्रतीक्षित वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. त्यांची नावे येथे पहा.
शरद केळकर यांची 'डॉक्टर्स' ही वेब सीरिज जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. ही मालिका २७ डिसेंबरला ओटीटीवर दाखल होणार आहे.
'सोरगावसल' ही सीरिज नेटफ्लिक्सवर २७ डिसेंबरला तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा पार्थिवन या छोट्या रेस्टॉरंटच्या मालकाभोवती फिरते, ज्यावर एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येचा खोटा आरोप लावण्यात आला आहे.
मराठीतील नवीन मालिका 'लक्ष्मी निवास' आजपासून झी ५वर सुरू होत आहे. त्याचा पहिला एपिसोड ओटीटीवर सुपरहिट झाला आहे.
१ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला 'भूल भुलैया ३' येत्या २५ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो, असं बोललं जात आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.