OTT Releases This Week : क्राईम थ्रिलर ते धमाल कॉमेडी; ‘या’ आठवड्यात ओटीटीवर काय काय प्रदर्शित होणार?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Releases This Week : क्राईम थ्रिलर ते धमाल कॉमेडी; ‘या’ आठवड्यात ओटीटीवर काय काय प्रदर्शित होणार?

OTT Releases This Week : क्राईम थ्रिलर ते धमाल कॉमेडी; ‘या’ आठवड्यात ओटीटीवर काय काय प्रदर्शित होणार?

OTT Releases This Week : क्राईम थ्रिलर ते धमाल कॉमेडी; ‘या’ आठवड्यात ओटीटीवर काय काय प्रदर्शित होणार?

Oct 14, 2024 10:50 AM IST
  • twitter
  • twitter
Web Series Releasing This Week : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर या आठवड्यात अनेक नवीन वेब सीरिज रिलीज होणार आहेत.
ऑक्टोबरचा तिसरा आठवडा सुरू झाला असून, या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या मालिकांची यादी समोर आली आहे. या आठवड्यात ५ नवीन वेब सीरिज आणि 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा एक नवीन भाग येणार आहे. तुम्ही देखील एकदा या यादीवर नजर टाकून आपल्या आवडीचा कंटेंट बघू शकता.
twitterfacebook
share
(1 / 7)

अभिनेत्री अदा शर्माची नवीन सीरिज 'रीता सन्याल' या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही एक इन्वेस्टिगेटिव कॉमेडी ड्रामा सीरिज आहे, ज्यामध्ये अदा एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज तुम्ही १४ ऑक्टोबरपासून पाहू शकता.
twitterfacebook
share
(2 / 7)

नीना गुप्ता यांची बहुप्रतिक्षित वेब सीरिज '१००० बेबीज' देखील या आठवड्यात डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ही एक मल्याळम सीरिज आहे, जी १८ ऑक्टोबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल. मल्याळम भाषेशिवाय ती हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(3 / 7)

‘सोल स्टोरीज’ नावाची एक नवीन मल्याळम वेब सीरिज मनोरमा मॅक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. महिलांवर आधारित ही सीरिज १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(4 / 7)

१८ ऑक्टोबर २०२४पासून नेटफ्लिक्सवर 'फॅब्युलस लाईफ व्हर्सेस बॉलिवूड वाईव्हज' प्रसारित होईल. सीझन ३मध्ये जुने कलाकार दिसणार आहेत. यात नीलम कोठारी, अनन्या पांडेची आई भावना पांडे, शनाया कपूरची आई महीप आणि सोहेल खानची माजी पत्नी सीमा सचदेव या दिसणार आहेत. याशिवाय रणबीर कपूरची बहीण रिद्धिमासह अनेक नवे चेहरेही यात दिसणार आहेत.
twitterfacebook
share
(5 / 7)

'द प्रदीप्स ऑफ पिट्सबर्ग'मध्ये गेल्या दोन वर्षांपासून पिट्सबर्गमध्ये राहणाऱ्या एका भारतीय कुटुंबाची कथा दाखवण्यात येणार आहे. ही कॉमेडी वेब सीरिज १७ ऑक्टोबरपासून प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होईल.
twitterfacebook
share
(6 / 7)

'द ग्रेट इंडियन कपिल शो २'च्या पुढील एपिसोडमध्ये 'फॅब्युलस लाईफ व्हर्सेस बॉलिवूड वाईव्हज सीझन ३'ची स्टारकास्ट येणार आहे. हा भाग नेटफ्लिक्सवर १९ ऑक्टोबर रोजी प्रसारित होईल.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज