या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेला 'स्त्री २' या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवरही धडकणार आहे.
अक्षय कुमारचा मल्टीस्टारर चित्रपट 'खेल खेल में' ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ९ ऑक्टोबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाईल. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क, फरदीन खान यांसारखे स्टार्स आहेत.
बरुण सोबती, अंजली आनंद आणि प्रिया बापट यांची विनोदी ड्रामा सीरिज 'रात जवान है' ही ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर स्ट्रीम होईल. यात तीन मित्रांची कहाणी दाखवण्यात आली आहे.
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर रिलीज होईल.
या आठवड्यात अक्षय कुमारचे एक नाही, तर दोन चित्रपट ओटीटीवर धडकणार आहेत. 'खेल खेल में' ९ ऑक्टोबरला, तर 'सरफिरा' ११ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 'सरफिरा' ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल.
डिस्ने प्लस हॉटस्टारवर ११ ऑक्टोबरपासून तामिळ चित्रपट 'वाझाई' प्रदर्शित होणार आहे. एका निरागस मुलाच्या बालपणीची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
'सिटाडेल: डायना' ही एक इटालियन वेब सीरिज आहे. ही सीरिज १० ऑक्टोबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होईल.
११ ऑक्टोबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 'लोनली प्लॅनेट' ही सीरिज पाहू शकता. या चित्रपटात एका लेखिकेची कथा दाखवण्यात आली आहे.