December OTT Release : 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच वेळी, एक चित्रपट आणि मालिका ओटीटीवर ५ डिसेंबरला आणि चार ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहेत.
(1 / 6)
डिसेंबरचा पहिला आठवडा सिनेप्रेमींसाठी धमाकेदार असणार आहे. या आठवड्यात चित्रपटगृहांपासून ओटीटीपर्यंत अनेक उत्तम चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होणार आहेत. पाहा यादी…
(2 / 6)
आलिया भट्ट आणि वेदांग रैनाचा 'जिगरा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबरला ओटीटीवर धडकणार आहे.
(3 / 6)
मानव विज, कबीर बेदी आणि रजत कपूर यांच्या 'तनाव' या वेब सीरिजचा दुसरा सीझनही या आठवड्यात ओटीटीवर दाखल होणार आहे. ही सीरिज ६ डिसेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लीव्हवर येणार आहे.
(4 / 6)
तृप्ती डिमरी, राजकुमार राव आणि अर्चना पूरण सिंह यांचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'जिगरा'सोबत हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
(5 / 6)
साई पल्लवीचा 'अमरन' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
(6 / 6)
प्रतीक गांधी आणि दिव्येंदू यांचा 'अग्नी' हा चित्रपट ६ डिसेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
(7 / 6)
या आठवड्यात हे चित्रपट आणि मालिका ओटीटीवर प्रदर्शित होत असताना, आत्तापर्यंतचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा २ : द रुल' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.