This Week OTT Releases : नेटफ्लिक्स आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक वेब सीरिज आणि चित्रपट स्ट्रीम केले जाणार आहेत. त्यांची रिलीज डेट जाणून घेऊया...
(1 / 7)
१८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान ओटीटीवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तुम्हालाही हे चित्रपट आणि सीरिज बघायच्या असतील, तर इथे दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते.
(2 / 7)
'ये काली काली आंखे' या सीरिजचा पुढचा सीझन २२ नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
(3 / 7)
डिस्ने प्लस हॉटस्टारची नवीन मालिका 'ठुकरा के मेरा प्यार' २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात अनिरुद्ध दवे आणि कपिल कानपुरिया यांसारखे प्रसिद्ध अभिनेते तसेच, धवल ठाकूर आणि संचिता बसू सारख्या नवीन कलाकारांच्या भूमिका आहेत.
(4 / 7)
नेटफ्लिक्सच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा पुढील भाग २३ नोव्हेंबर रोजी प्रसारित होईल. यावेळी शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल दिसणार आहेत.
(5 / 7)
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या जीवनावर आधारित 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' हा माहितीपट १८ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
(6 / 7)
शंतनू माहेश्वरी आणि श्रुती सिन्हा यांच्या 'कॅम्पस बीट्स' या मालिकेचा चौथा सीझन २० नोव्हेंबर रोजी एमएक्स प्लेयरवर दाखल होणार आहे.
(7 / 7)
‘ग्रीडी पीपल’ या हॉलिवूड चित्रपटात दोन लोभी पोलिसांची अनोखी कहाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा इंग्रजी चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म लायन्स गेटवर प्रदर्शित होणार आहे.