This Week OTT Releases: नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह, झी ५, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहा चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.
(1 / 7)
या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहा चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. या सहा चित्रपटांची आणि सीरिजची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्ही देखील विकेंडला घरी बसून चित्रपट किंवा सीरिज बघण्याचा विचार करत असाल, तर ही यादी तुमच्यासाठीच आहे…
(2 / 7)
'इंडियन २' हा १९९६च्या 'इंडियन' चा सिक्वेल, थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. परंतु, हा चित्रपट केवळ तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
(3 / 7)
२०२१मध्ये रिलीज झालेल्या 'हसीन दिलरुबा' या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाचा सिक्वेल 'फिर आयी हसीन दिलरुबा' या आठवड्यात रिलीज होणार आहे. आधीच्या चित्रपटाची कथा जिथे संपली, तिथून या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. यात तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि सनी कौशल दिसणार आहेत. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
(4 / 7)
'ग्यारह ग्यारह' ही काल्पनिक थ्रिलर वेब सीरिज आहे. याची कथा १९९०, २००१ आणि २०१६ या सालांमध्ये गुंफलेली आहे. यात राघव जुयाल आणि धैर्य करवा सोबत कृतिका कामरा मुख्य भूमिकेत आहे. ही सीरिज ९ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी ५’वर रिलीज होणार आहे.
(5 / 7)
पार्थ समथान, खुशाली कुमारी, संजय दत्त आणि रवीना टंडन यांचा रोमँटिक कॉमेडी 'घुडचडी' ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन बिनॉय गांधी यांनी केले आहे.
(6 / 7)
दक्षिण भारतीय स्टार मामूटीचा 'टर्बो' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये ७१ कोटींची कमाई केली असून, आता तो ९ ऑगस्ट रोजी सोनी लिव्हवर धडकणार आहे.
(7 / 7)
'मिर्झापूर ३'मध्ये मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा अभिनेता दिव्येंदू आता कॉमेडी-ड्रामा मालिकेत दिसणार आहे. त्याची 'लाइफ हिल गई' ही सीरिज ९ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नीप्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत कुशा कपिला आणि कबीर बेदी दिसणार आहेत.