आजकाल ओटीटीवर अनेक नवे जुने चित्रपट प्रदर्शित होत असतात. जर तुम्हाला दाक्षिणात्य हॉरर चित्रपट आवडत असतील तर ओटीटीवर कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा..
(1 / 5)
अभिनेत्री तापसी पन्नू महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'आनंदब्रह्मो' हा हॉरर कॉमेडी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने केले आहे.
(2 / 5)
हंसिका आणि अँड्रिया मुख्य भूमिकेत असलेला तमिळ चित्रपट 'अरमानाई'ने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे.
(3 / 5)
दिलकु दुड्डू हा तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चर्चेत होता. हा चित्रपट सन नेक्स्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
(4 / 5)
लॉरेन्सच्या कंचना या चित्रपटाने तुफान कमाई केली होती. हा चित्रपट आता अॅमेझॉन प्राईम या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
(5 / 5)
गीतांजली हा तेलुगु हॉरर कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट झी ५वर पाहायला मिळत आहे.