‘दो पत्ती’ हा चित्रपट या शुक्रवारी, २५ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होणार आहे. क्रिती सेनन, काजोल आणि शाहीर शेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या क्राईम थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक चतुर्वेदी यांनी केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स ओटीटीवर हिंदी, तेलुगू आणि इंग्रजी भाषेत स्ट्रीम होईल.
हॉरर थ्रिलर चित्रपट 'डोंट मूव्ह' २५ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होणार आहे. अॅडम शिंडलर आणि ब्रायन नीटो दिग्दर्शित या चित्रपटात केल्सी अॅस्बिल आणि फिन विट्रोक मुख्य भूमिकेत आहेत.
तमिळ चित्रपट ‘मयलगन’ देखील २५ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. ‘सत्यम सुंदरम’ या चित्रपटाचे हे तेलुगू व्हर्जन आहे. सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. ‘मयलगन’ चित्रपटात तमिळ स्टार कार्ती आणि अरविंद स्वामी मुख्य भूमिकेत असून, प्रेम कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे.
अॅडव्हेंचर फॅन्टसी कॉमेडी चित्रपट 'फॅमिली पॅक' २३ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा फ्रेंच चित्रपट तेलगू, इंग्रजी, तमिळ आणि हिंदी भाषेतही उपलब्ध आहे.