जर तुम्हाला हॉरर, सस्पेन्स किंवा क्राईम थ्रिलर वेब सीरिज बघून कंटाळा आला असेल,आणि तुमचा मूड सुधारेल असे काहीतरी पाहायचे असेल, तर ही यादी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वीकेंडला तुम्ही या वेब सीरिज ओटीटीवर हिंदीमध्ये पाहू शकता.
'फादर्स' या वेब सीरिजमध्ये तीन सेवानिवृत्त वडिलांची कथा दाखवण्यात आली आहे. या मालिकेत नव्या-जुन्या पिढ्यांच्या जीवनशैलीला कॉमेडीचा टच दाखवण्यात आला आहे. तुम्हाला ही मालिका बघायची असेल तर तुम्ही ती ओटीटी प्लॅटफॉर्म एम एक्स प्लेयरवर पाहू शकता.
'हसमुख' या वेब सीरिजची कथा उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीवर आधारित आहे, ज्याला स्टँड अप कॉमेडियन बनण्याची इच्छा आहे. पण, त्याला समाजात फारसा मान मिळत नाही. ही मालिका तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
'झी ५'ची 'पिचर्स' ही वेब सीरिज तीन मित्रांवर आधारित आहे, जे आपली नोकरी सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू करतात. या सीरिजचे दोन सीझन आले आहेत.
'पर्मनंट रूममेट्स' ही केवळ कॉमेडीच नाही तर रोमँटिक वेब सीरिजही आहे. तुम्ही ही वेब सीरिज 'झी ५'वर पाहू शकता.
'होम शांती' या कॉमेडी वेब सीरिजची कथा काहीशी 'खोसला का घोसला' या चित्रपटाशी मिळतीजुळती आहे. तुम्हाला ही सीरिज बघायची असेल, तर तुम्ही ती ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पाहू शकता.