OTT 2023: एकीकडे २०२३मध्ये अनेक चित्रपटांनी बक्कळ कमाई केली. तर, दुसरीकडे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी ओटीटी विश्वाची वाट धरली
(1 / 10)
एकीकडे २०२३मध्ये अनेक चित्रपटांनी बक्कळ कमाई केली. तर, दुसरीकडे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी ओटीटी विश्वाची वाट धरली. या यादीत आदित्य रॉय कपूरपासून ते वरुण धवनपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे.
(2 / 10)
अभिनेता आदित्य रॉय कपूरने या वर्षी 'द नाईट मॅनेजर'मधून ओटीटी विश्वात पदार्पण केले. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या या वेब सीरिजमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
(3 / 10)
यावर्षी करीना कपूर खानने देखील ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित करीनाचा 'जाने जान' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
(4 / 10)
अभिनेता अनिल कपूरनेही 'द नाईट मॅनेजर' या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. अनिल कपूरने या सीरिजमधून खूप वाहवा मिळवली आहे.
(5 / 10)
अभिनेत्री काजोलने २०२३मध्ये डिजिटल विश्वात पदार्पण केले होते. काजोलने डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या 'द ट्रायल'मधून ओटीटी पदार्पण केले. या मालिकेत काजोलने वकिलाची भूमिका साकारली होती.
(6 / 10)
वरुण धवनने 'बवाल' या चित्रपटाद्वारे ओटीटीवर पदार्पण केले. या चित्रपटात जान्हवी कपूर वरुणसोबत दिसली होती. नितेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता.
(7 / 10)
सोनम कपूरने 'ब्लाइंड'मधून ओटीटी डेब्यू केला होता. मात्र, हा चित्रपट कधी आला आणि गेला हे कळलेच नाही. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडू शकला नाही.
(8 / 10)
सोनाक्षी सिन्हाने अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या 'दहाड' या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले. 'दहाड'मध्ये सोनाक्षी सिन्हा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली.
(9 / 10)
अदिती राव हैदरीने 'झी५'ची वेब सीरिज 'ताज'मधून ओटीटी पदार्पण केले आहे. आदितीने या वेब सीरिजमध्ये अनारकलीची भूमिका साकारली होती.
(10 / 10)
तारा सुतारियाने 'अपूर्वा' चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केले. तिचा हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता.