मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Oscars 2024: ऑस्कर विजेत्या अभिनेत्यांचं कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल फॅन असल्याचा अभिमान! पाहा काय झालं...

Oscars 2024: ऑस्कर विजेत्या अभिनेत्यांचं कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल फॅन असल्याचा अभिमान! पाहा काय झालं...

Mar 11, 2024 11:40 AM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Oscars 2024 Special Moments: नुकताच ‘ऑस्कर २०२४’चा भव्य सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता सिलियन मर्फी आणि रॉबर्ट डाउनी ज्युनिअर यांनी जगभरातील चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत.

‘ऑस्कर २०२४’च्या सोहळ्यात अभिनेत्री फ्लोरेन्स पुग रेड कार्पेटवर प्रेक्षकांसोबत फोटोसाठी पोज देताना दिसली. यावर्षी तिला नामांकन मिळाले नसले, तरी तिच्या 'ओपेनहायमर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअर यावेळी आपल्या एका सहाय्यक अभिनेत्रीची मदत करताना दिसला. 'द होल्डओव्हर्स'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री दा'व्हाइन जॉय रॅन्डॉल्फ हिचा ड्रेस सावरण्यात अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअर याने मदत केली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरला ९६व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘ओपेनहायमर’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

'द होल्डओव्हर्स'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री दा'व्हाइन जॉय रॅन्डॉल्फ आणि 'ओपेनहायमर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर विजेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअर एकत्र फोटो पोज देताना दिसले आहेत. तर, यावेळी 'ओपेनहायमर'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेता सिलियन मर्फी याने 'पुअर थिंग्ज'फेम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराची ऑस्कर विजेती अभिनेत्री एम्मा स्टोन हिचा ड्रेस सांभाळण्यात मदत करत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

अभिनेत्री एम्मा स्टोनला ‘पुअर थिंग्ज’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला आहे. ‘ला ला लँड’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेल्या अभिनेत्री एम्मा स्टोनचे हे पाचवे नामांकन आणि दुसरे विजेतेपद आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

अभिनेत्री एमिली ब्लंट तिच्या ‘ओपेनहायमर’ फेम दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांना चुंबन देताना दिसली. एमिलीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते. परंतु, दा'व्हाइन जॉय रॅन्डॉल्फकडून तिला पराभव पत्करावा लागला. तर, नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

यावेळी अभिनेता रायन केन गोसलिंग रेड कार्पेटवर चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसला. रायनला ऑस्करच्या शर्यतीत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले. मात्र, या पुरस्कारावर अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरने आपले नाव कोरले.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

यावेळी अभिनेता रायन केन गोसलिंग रेड कार्पेटवर चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसला. रायनला ऑस्करच्या शर्यतीत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले. मात्र, या पुरस्कारावर अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरने आपले नाव कोरले.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज