ऑस्कर पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. केवळ स्टार्सच नाही तर, चाहतेही या पुरस्काराची वाट पाहत असतात. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाल्यापासून प्रत्येकजण खूप उत्सुक आहे. या यादीत ३२३ फीचर फिल्म्सची घोषणा करण्यात आली आहे. ७ भारतीय चित्रपटांनी ऑस्कर पुरस्कार २०२५च्या सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. हे चित्रपट कोणते आहेत आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते पाहू शकता, ते जाणून घेऊया...
साऊथचा सुपरस्टार सूर्या आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा चित्रपट 'कंगुवा'नेही ऑस्कर २०२५च्या यादीत आपले स्थान मिळवले आहे. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
'आदुजीवितम: द गोट लाइफ' हा चित्रपट देखील ऑस्कर २०२५च्या शर्यतीत सामील झाला आहे. २०२४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
भारताच्या कथेवर आधारित 'संतोष' या लघुपटाचाही या यादीत समावेश आहे. तथापि, ब्रिटनचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट म्हणून तो ऑस्कर पुरस्कार २०२५च्या शर्यतीत पोहोचला आहे. याचे दिग्दर्शन संध्या सुरी यांनी केले आहे. तुम्ही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म 'मोबी'वर पाहू शकता.
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाच्या 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटाचाही ऑस्कर २०२५च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, पण ऑस्करच्या यादीत या चित्रपटाला स्थान मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही झी ५वर पाहू शकता.
ऑस्कर २०२५च्या यादीत 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट'चाही समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटातील दिव्या प्रभा, कनी कुसरुती, ह्रदू हारून आणि छाया कदम यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. तुम्ही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
शुची तलाटी दिग्दर्शित 'गर्ल्स विल बी गर्ल्स' या चित्रपटाचाही ऑस्कर २०२५च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर इंग्रजी, हिंदी आणि मल्याळममध्ये रिलीज झाला आहे.