भात की पोळी... तुमच्यासाठी योग्य काय? - वजन कमी करणाऱ्या आणि आरोग्याबाबत जागरूक असलेल्या लोकांना भात किंवा पोळी यापैकी एक निवडण्याची समस्या अनेकदा भेडसावते. जर तुम्ही स्नायू तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत असाल तर तुम्ही कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार घ्यावा. जर तुम्ही पोळी आणि भात निवडण्यात कंफ्यूज असाल तर दोघांचे पौष्टिक मूल्य जाणून घ्या.
तुम्ही दोन्ही कमी प्रमाणात खाऊ शकता पण… - पोळी आणि भात दोन्ही आपल्या शरीराच्या ऊर्जेसाठी आवश्यक आहेत. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा स्नायू बनवायचे असतील तर यापैकी एकही सोडून देणे आवश्यक नाही. तुम्ही भात आणि पोळी दोन्ही कमी प्रमाणात खाऊ शकता. तांदळात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे ते तयार करण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या आणि कमी प्रमाणात खा.
पोळीचे पौष्टिक मूल्य - ६ इंचाच्या पोळीमध्ये १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ७१ कॅलरीज, ३ ग्रॅम प्रथिने आणि ०.४ ग्रॅम फॅट असते
मिलेट्सची भाकरी खा - गव्हापासून बनवलेली पोळी ही भाताच्या तुलनेत कमी कार्बोहायड्रेट स्त्रोत मानली जाते. जर तुम्हाला पोळीचे पौष्टिक मूल्य वाढवायचे असेल तर तुम्ही नाचणी, कुट्टू, ज्वारी यांसारख्या मिलेट्सने रिप्लेस करू शकता.
तांदळाचे पौष्टिक मूल्य - एक कप शिजवलेल्या भातामध्ये ३० ते ५० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असू शकतात. यामध्ये १३५-२०५ कॅलरीज, ३-४-६ ग्रॅम प्रथिने, ०.४४-२ ग्रॅम फॅट, ०.६३२ ग्रॅम फॅट असते. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण तांदळाच्या विविधतेनुसार आणि तयार करण्याच्या पद्धतीनुसार बदलू शकते. उदाहरणार्थ कुकर वापरण्याऐवजी उकळून आणि पाणी काढलेला भातात कमी कर्बोदके असतात.
डाळीमध्ये देखील कर्बोदके असतात - डाळ किंवा वरणामध्ये सुद्धा पुरेशा प्रमाणात कार्बोहायड्रेट असते, त्यामुळे जेव्हा तुम्ही वरण आणि भात एकत्र खातात तेव्हा हे कॉम्बो शरीरासाठी खूप चांगले असते. त्यात अत्यावश्यक अमीनो अॅसिड असतात. तथापि जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रमाण कमी ठेवा आणि व्यायाम करा.
आहार संतुलित ठेवा - निरोगी राहण्यासाठी आहार संतुलित ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रकारचे अन्न कमी प्रमाणात असावे. जर तुम्ही प्रौढ असाल तर जास्तीत जास्त भाज्या आणि सलाद, त्यानंतर डाळी आणि नंतर कमीत कमी कार्बोहायड्रेट ठेवा. यासोबतच पनीर, दही, ताक यांसारखी प्रथिने आणि तूप सारखे हेल्दी फॅट्सही घ्या.