
०२ एप्रिल हा दिवस प्रत्येक भारतीय चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील. भारतीय क्रिकेटमधील आजवरच्या सर्वोत्कृष्ट क्षणांपैकी एक आहे. त्या आठवणींना एकदा उजाळा देऊया.
१९ फेब्रुवारी २०११ रोजी बांगलादेशातील ढाका येथे भारताने विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली. पहिला सामना जिंकून त्यांनी चांगली सुरुवात केली. वीरेंद्र सेहवाग या सामन्याचा हिरो ठरला.
भारताने आयर्लंडवर सहज विजय मिळवला. या सामन्यात पाच विकेट्स आणि ५० धावा केल्याबद्दल युवराज सिंहला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
डच संघाने ३६.३ षटकांत दिलेल्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ५ गडी राखून सामना जिंकला.
सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी एक शानदार शतक झळकावले. मात्र रोमांचक सामन्यात भारताचा पराभव झाला. या स्पर्धेतील हा एकमेव सामना भारताने गमावला.
चेन्नईत झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. युवराज सिंहने शानदार शतक झळकावले. भारताने ८० धावांनी विजय मिळवत ट्रॉफीच्या जवळ पोहोचले.
मोहालीत झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले, भारताने २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. भारताचा कर्णधार एमएस धोनीने षटकार ठोकून अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत भारतीय क्रिकेट संघासाठी एक ऐतिहासिक क्षण रचला.






