(4 / 4)शशांक केतकर याने सोशल मीडियावर आपण पुन्हा बाबा होणार असल्याची माहिती दिली आहे. त्याने सोशल मीडियावर बायको व मुलाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये प्रियांका गरोदर असल्याचे दिसत आहे. शशांकने हे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, '२०२५चं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई-बाबा पुन्हा एकदा आजी-आजोबा व्हायला तयार झालो आहोत'.