Olympic Athlete Vinesh Phogat Diet: सध्या ऑलिम्पिकची जोरदार चर्चा सुरु आहे. देशातील अनेक तरुण खेळाडू आपल्या उत्तम कामगिरीने देशाची मान उंचावत आहेत. त्यातीलच एक खेळाडू म्हणजे रेसलर विनेश फोगाट होय.
(1 / 8)
सध्या ऑलिम्पिकची जोरदार चर्चा सुरु आहे. देशातील अनेक तरुण खेळाडू आपल्या उत्तम कामगिरीने देशाची मान उंचावत आहेत. त्यातीलच एक खेळाडू म्हणजे रेसलर विनेश फोगाट होय. विनेश ५० किलोग्रॅम वजनी गटात उपांत्य फेरीत पोहोचली होती.
(2 / 8)
विनेश फोगटने क्युबाच्या युस्नेलीस गुजमॅनला चितपट करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र दुर्दैवाने या फेरीत तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. परंतु विनेशचा हा प्रवास फारच रोमांचक होता. सर्वांनाच तिचं कौतुक वाटत आहे.
(3 / 8)
विनेश फोगटने ही शरीरयष्टी कशी कमावली? यासाठी ती नेमका काय खुराक घेते याची अनेकांना उत्सुकता वाटतं आहे. म्हणूनच आज आपण तिचा देसी डाएट जाणून घेणार आहोत.
(4 / 8)
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विनेशने सांगितलं होतं की, तिला घरातील भाजी भाकरीच खायला आवडते. गरम-गरम चपातीवर घरातील लोणी आणि भाजी हे ती खात असते.
(5 / 8)
विनेशने सांगितलं की, सुरुवातीच्या काळात तिला डाएटबाबत काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे ती नाश्ताच करत नसे. थेट दुपारी भाजी-भाकरी खायची. आणि रात्री उकडलेली अंडी आपल्या आहारात घेत होती.
(6 / 8)
परंतु आता प्रोटीन आणि अन्य पोषक घटक मिळवण्यासाठी ती सकाळी नाश्त्यात, अंडी, ओट्स टोमॅटो आणि ब्राऊन ब्रेड खाते.
(7 / 8)
दुपारच्या जेवणात ती, शरीराच्या गरजेनुसार, भाकरी-भाजी, प्रोटीनसाठी चणे, राजमा, दही आणि सॅलड खाते. तर रात्रीच्या जेवणात ती, भाकरी, अंडी आणि सॅलड खाते. याशिवाय ती सायंकाळी ड्रायफ्रूट्स, ड्रायफ्रूट्स प्रोटीन शेक घेत असते.
(8 / 8)
याशिवाय विनेश सकाळ-संध्याकाळ प्रचंड एक्सरसाइज करत असते. रेसलिंग प्रॅक्टिस, इंटेन्स वर्कआउट, वेट ट्रेनिंग तसेच ब्रीदिंग, एन्ड्युरन्स यासंबंधी विविध व्यायाम ती मेहनतीने करत असते.