तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, असे देखील म्हटले जाते. तुळशीची पूजा कशी करावी, याचे अनेक विधी शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. तसेच, तुळशीची योग्य पूजा केल्याने आपल्या अनेक अडचणी दूर करण्यात देखील फायदेशीर ठरते.
दररोज संध्याकाळी तुळशीची पूजा केल्यानंतर, तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते.
शास्त्रानुसार, महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशींना तुळशीच्या रोपाची पूजा करताना, तुळशी मातेला सौभाग्याचे लेणे अर्पण करावे. यात बांगड्या, टिकली, लाल कापड, कुंकू या गोष्टींचा समावेश असावा. यामुळे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात.
दर महिन्याच्या पंचमीला पाण्याबरोबर उसाचा रसही तुळशीला अर्पण करावा. हा उपाय केल्याने घरात नेहमी धन, सुख, समाधान आणि शांती नांदते. तसेच, जीवनात आनंद येतो असे म्हटले जाते.