दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही नेटफ्लिक्सवर उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होत आहेत. या वीकेंडला तुम्हाला कॉमेडीपासून ते अॅक्शन आणि सायकॉलॉजिकल थ्रिलरपर्यंतचा कंटेंट पाहायला मिळेल.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन २’चा नवीन भाग शनिवारी प्रदर्शित होणार आहे. यावेळी कपिलच्या शोमध्ये रोहित शर्मासह भारतीय क्रिकेट संघातील काही चेहरे दिसणार आहेत. कपिलसोबत क्रिकेटर्सची धमाल मस्ती पाहण्यासाठी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवीन एपिसोड नक्की पहा.
अनन्या पांडेचा ‘कंट्रोल’ हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर असेल. हा चित्रपट तुम्हाला सायबर गुन्ह्याच्या दुनियेत घेऊन जाईल.
‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ अर्थात ‘गोट’ हा चित्रपट गुरुवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य ॲक्शन पाहायला मिळणार आहे.
‘प्लॅटफॉर्म’चा सीझन २ या शुक्रवारी रिलीज होणार आहे. हा एक हिंसक चित्रपट आहे. हा पूर्णपणे एक काल्पनिक चित्रपट आहे, जो तुम्हाला विचार करायला लावेल.
‘इट्स व्हाट इनसाईड’ हा चित्रपट देखील एक सायकॉलॉजिकल ड्रामा चित्रपट आहे. जेव्हा काही जुने कॉलेज मित्र भेटतात, तेव्हा ती भेट त्यांच्यासाठी एक भयानक स्वप्न बनते. हा चित्रपट शुक्रवारी नेटफ्लिक्स रिलीज होत आहे.