
ऑक्टोबर महिन्यात सहा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. विशेष म्हणजे तीन चित्रपट बॉलिवूडचे आहेत. दोन चित्रपट साऊथचे आहेत आणि एक चित्रपट हॉलिवूडचा आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटांविषयी…
सुपरस्टार रजनीकांत यांचा 'वेट्टियाँ' हा चित्रपट १० ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत अमिताभ बच्चनही आहेत. वेट्टीयाँचा अर्थ शिकारी होतो. त्यामुळे आता चित्रपटात काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि अनेक गाणी रिलीज झाली आहेत.
आलिया भट्टचा 'जिगरा' हा चित्रपटही ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. आलियाने करण जोहरसोबत या चित्रपटाची निर्मिती केली असून ती चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
टॉम हार्डीचा 'वेनम द लास्ट डान्स' हा चित्रपट ऑक्टोबरच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.



