यंदा शनिवार, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असल्यामुळे याला विशेष महत्त्व असते. यंदा अनेक वर्षानंतर सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे. अमावस्येला रात्री ८ः३४ वाजता ग्रहण सुरू होणार असून दुपारी २ः२५ पर्यंत चालेल. या दिवशी शनी अमावास्या सुद्धा आहे.
सर्वपित्री अमावास्या ही सूर्यग्रहणाच्या सावलीत साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीपूजन करू नये. तुळशीची पानेही तोडू नये. असे केल्याने महालक्ष्मी क्रोधित होईल, असा समज आहे.
सर्वपित्री अमावास्येला जी व्यक्ती जप, तपस्या व व्रत पाळणार आहे त्याने ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक असते. या दिवशी संभोग करू नये. असे केल्यास पितरांचा राग येतो असे म्हणतात. यामुळे राहू-केतूचा जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.
सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केल्याने पितरांना मोक्ष मिळतो. यंदा सर्वपित्री अमावास्येवर सूर्यग्रहणाचा प्रभाव आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी खबरदारी घेणे गरजेचे आगे. विशेषकरून गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये. तसेच तीक्ष्ण वस्तुंचा वापर करू नये.
पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी बाहेर नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते. त्यामुळे या दिवशी मांसाहार करू नये. निर्जन जंगलात जाण्यात काही गैर नाही.
(Freepik)वर्षभरात तसेच पितृपक्षात ज्यांना कुणाला आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालता आले नाही किंवा ज्या मृतांची नेमकी तिथी माहीत नाही ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते.