Nudist Exhibition: कपडे काढल्यानंतरच 'या' म्युझियममध्ये मिळते एन्ट्री, पण 'हे' आहे तरी कुठे? वाचा-nude visitors welcome at french naturism exhibition ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nudist Exhibition: कपडे काढल्यानंतरच 'या' म्युझियममध्ये मिळते एन्ट्री, पण 'हे' आहे तरी कुठे? वाचा

Nudist Exhibition: कपडे काढल्यानंतरच 'या' म्युझियममध्ये मिळते एन्ट्री, पण 'हे' आहे तरी कुठे? वाचा

Aug 29, 2024 07:51 PM IST

Naturism exhibition: हे एक्झिबिशेन महिन्यातून एकदा असते आणि हे पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात.

French naturism exhibition
French naturism exhibition

French Nudist Exhibition: जगात अनेक विचित्र गोष्टी आहेत, ज्याबद्दल आपण कधीच कल्पना केली नसेल. फ्रान्समध्ये एक संग्रहालय आहे, जिथे महिन्यातून एकदा नग्न छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाते. आश्चर्यचकीत गोष्ट म्हणजे, हे पाहण्यासाठी लोकांनाही आपल्या अंगावरचे कपडे काढून टाकावे लागतात. या संग्रहालयात फक्त शूज घालण्याची परवानगी आहे. फ्रान्समधील या संग्रहालयाला जे मार्सेल म्युझियम म्हणून ओळखले जाते. या संग्रहालयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

फ्रान्सच्या एफएफएन नॅचुरिस्ट संस्थेचे प्रमुख एरिक स्टेफनट यांनी एएफपीला सांगितले की, यावेळी हे प्रदर्शन ९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ते महिन्यातून एकदा पर्यटकांसाठी खुले केले जाईल. नॅचुरिस्ट पॅराडाइज फ्रेंच नॅचुरिस्ट फेडरेशन च्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात ६०० हून अधिक छायाचित्रे, चित्रपट, चित्रे, मासिके, शिल्पे आणि बरेच काही पाहायला मिळते, जे फ्रान्समधील निसर्गशास्त्रज्ञांनी लोकांसमोर सादर केले. या संग्रहालयाची जगभर चर्चा आहे.

पर्यटकांनी सांगितला त्यांचा अनुभव

इंग्लंडमधील दोन पर्यटकांनी फ्रान्समधील या संग्रहालयाला भेट दिली होती. यानंतर त्यांनी आपला अनुभव जगासमोर ठेवला होता. द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे सांगितले की, फ्रान्समधील लोक किती मुक्त विचारसरणीचे आहेत हे पाहून आश्चर्य वाटले. किरन पार्कर-हॉल आणि झेंडर पेरी यांनी कपड्यांशिवाय संग्रहालयाच्या प्रदर्शनाला भेट दिली. हा आमच्यासाठी एक अनोखा अनुभव आहे. कारण इंग्लंडमध्ये असे स्वातंत्र्य नाही. कारण इंग्लंडमध्ये नग्न राहणे विचित्र मानले जाते. परंतु, ज्यांना खरोखर निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे ते फ्रान्समध्ये येऊन या संग्रहालयाला भेट देऊ शकतात.

कपडे काढल्यानंतरच संग्रहालयात एन्ट्री

फ्रेंच नॅचुरिस्ट संघटनेचे प्रमुख ब्रुनो सुआरेझ म्हणतात की, नॅचुरिस्ट आंदोलनाला स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये १९व्या शतकात सुरू झाली. फ्रान्समधील पहिले नॅचुरिस्ट गट १९३० च्या दशकात दक्षिण- पूर्व प्रोव्हन्स भागात उदयास आले आणि ते देशभर पसरले. पण पूर्ण कपडे घालूनही लोक हे प्रदर्शन पाहायला येऊ शकतात का? याला उत्तर देताना संग्रहालयाच्या प्रवक्त्याचे असे म्हटले आहे की, हे थोडे विचित्र मानले जाऊ शकते. कारण या संग्रालयात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांसमोर कपडे काढण्याची अट ठेवली जाते.

विभाग