पारस छाब्राची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने अलीकडेच एग्स फ्रीझिंगच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याची माहिती दिली होती. अभिनेत्रीसाठी ही प्रक्रिया अतिशय कठीण होती. तिची शस्त्रक्रिया अद्याप बाकी आहे. पण, मातृत्वाच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याने अभिनेत्री आनंदी आहे.
काजोलची धाकटी बहीण तनिषाचे अद्याप लग्न झालेले नाही. पण, आई होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या अभिनेत्रीने वयाच्या ३९व्या वर्षी तिचे एग्ज फ्रीज केले आहेत. आता ती भविष्यात कधीही आई होऊ शकते.
अभिनेत्री मोना सिंहने तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिने वयाच्या ३४व्या वर्षी फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने तिची ‘एग्ज फ्रीज’ करण्याची प्रक्रिया केली होती. ही प्रक्रिया काही महिने चालते ज्यामध्ये व्यक्तीला अनेक हार्मोनल बदल करावे लागतात.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे लग्न निक जोनाससोबत होण्यापूर्वीच तिची एग्स फ्रीज प्रक्रिया केली होती. हा सल्ला तिला तिची डॉक्टर आई मधु चोप्रा यांनी दिला होता. अंडी गोठवण्याच्या प्रक्रियेदरम्यान अभिनेत्री कठीण काळातून गेली. तिला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते.
आपल्या अनेक विवादांमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या राखी सावंतनेही आई होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी तिची गर्भाशयातील अंडी गोठवली होती. आता ती कधीही आई होण्याचा आनंद घेऊ शकते.
अभिनेत्री ईशा गुप्तानेही काही वर्षांपूर्वी तिची एग्स फ्रीज शस्त्रक्रिया केली होती. बॉयफ्रेंड मॅन्युएल मॅकगुइलरसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी २०१७मध्ये तिने ही प्रक्रिया केल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते.