श्वेता तिवारी पासून ते चारु असोपापर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या खासगी आयुष्यात वादळ आले आहे. या अभिनेत्रींचा दुसरा संसारही फार टिकला नाही. या यादीमध्ये कोणत्या कोणत्या अभिनेत्री आहेत चला जाणून घेऊया...
(1 / 7)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौरच्या आयुष्यात सध्या मोठे वादळ आले आहे. शालीन भनोटसोबत पहिला घटस्फोट झाल्यानंतर उद्योगपती निखिल पटेलशी तिने दुसरे लग्न केले. पण काही महिन्यातच त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला.
(2 / 7)
अभिनेत्री श्वेता तिवारीने दोन वेळा लग्न केले आहे. तिने राजा चौधरीशी पहिले लग्न केले त्यानंतर २०१३मध्ये तिने अभिनय कोहलीशी लग्न केले. पण तिची दोन्ही लग्ने अपयशी ठरली.
(3 / 7)
चारु असोपा हिच्या नशीबात प्रेम लिहिलेले नाही. २०१९मध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीवशी लग्न केले. पण तिचे लग्न फार काळ टिकले नाही.
(4 / 7)
अभिनेत्री चाहत खन्नाने दोन वेळा लग्न केले आहे. पहिला घटस्फोट झाल्यानंतर तिने २०१३मध्ये फरहान मिर्झाशी लग्न केले. लग्नाचा पाच वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
(5 / 7)
अभिनेत्री स्नेहा वाघने पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यावर उद्योगपती अनुराग सोलंकीशी लग्न केले. पण वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला.
(6 / 7)
दीपशिखा नागपालची दोन्ही लग्न अपयशी ठरली. २०१२मध्ये तिने अभिनेता केशव अरोराशी लग्न होते. पण त्यांनी ४ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
(7 / 7)
प्रिया बठीजाने पहिल्या घटस्फोटानंतर २०१७मध्ये डीजे कंवलजीत सलूजाशी लग्न केले. पण तिचे हे लग्न देखील अपयशी ठरले.