जर्मनी, स्वित्झर्लंड, चीन, इंग्लंड, स्पेन आणि काही देशात नॉर्दर्न लाइट्सचे चमकदार जांभळे, हिरवे, पिवळे आणि गुलाबी रंग जगभरात अवकाशात पाहिले गेले. ही घटना जेव्हा घडली तेव्हा रात्र होती, बरेच लोक झोपले होते. पण जे लोक जागे होते, त्यांना हे सुंदर असं दृश्य डोळ्यांनी पाहहता आले आहे. त्यांनी हे अद्भुत दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.
(AP)शनिवारी रात्री आकाश हा खास नजारा अमेरिका, तस्मानिया, बहामास आदी ठिकाणच्या नागरिकांनी पाहिला. या प्रकाशाला नॉर्दर्न लाइट्स तसेच ऑरोरा बोरेलिस असेही म्हणतात. सौरवादळामुळे ही घटना घडली आहे.
(AFP)जेव्हा सूर्यापासून निघणाऱ्या कणांच्या लाटा पृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्रात येतात तेव्हा दोघांमध्ये प्रतिक्रिया होते आणि असा रंगीबेरंगी प्रकाश निर्माण होतो. आकाशात हिरव्या, लाल आणि जांभळ्या रंगाच्या प्रकाश लाटा दिसतात.
याआधी २००३ साली अशी घटना घडली होती. २०वर्षांनंतर असं मोठं सौरवादळ पृथ्वीवर धडकलं आहे. युरोप, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड इथं हे दृश्य पाहायला मिळालं.
दोन दशकांहून अधिक काळातील सर्वात शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर शनिवारी रात्री धडकले. टास्मानिया ते ब्रिटनपर्यंत नॉर्दर्न लाइट्सचा आकर्षक नजारा दिसला. शनिवार व रविवारपर्यंत हा नजारा टिकून राहिला. या सौर वादळामुळे पृथ्वीवर काही ठिकाणी ब्लॅक आउट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
लाटोरेल, ओरेगॉन येथे ११ मे रोजी पहाटे कोलंबिया नदी घाटावरील चँटिकलीर पॉइंट लुकआउट येथे प्रेक्षक येथे नॉर्दर्न लाइट्सचे दृश्य पाहत असतांना.
कॅन्सस, नेब्रास्का, आयोवा, मिशिगन, मिनेसोटा आणि इतर मिडवेस्टर्न राज्यांतील लोक क्षितिजाच्या बाजूने चमकदार रंगांचे फोटो काढण्यात मग्न होते. लोक क्राइस्टचर्चच्या रोलेस्टन बाहेरील भागात अरोरा ऑस्ट्रेलिसकडे पाहत असतांना.
यू.एस. नॅशनल ओशियानिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने सांगितले की, भूचुंबकीय सौर वादळाची तीव्रता शनिवारीही कायम राहिली. या सौर वादळामुळे काही देशात पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाले. तर हाय फ्रिक्वेंसी कम्युनिकेशन्समध्ये देखील काही ठिकाणी व्यत्यय आले.
या सौर वादळामुळे काही देशात पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाले. तर हाय फ्रिक्वेंसी कम्युनिकेशन्समध्ये देखील काही ठिकाणी व्यत्यय आले.