(1 / 4)उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचे नाव ऐकताच जगातील बड्या बड्या देशांच्या तोंडचे पाणी पळते. किम जोंग यांचे विचित्र निर्णय, त्यांचा खास अंदाज आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जगात नेहमीच चर्ता होत असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या रहस्यमयी आयुष्य़ाचा एक मोठा भाग आहे, त्यांची बुलेटप्रूफ ट्रेन. जी केवळ त्यांचा राजेशाही थाट व शानो शौकतीचे प्रतीक नसून त्यांच्या अदभूत सुरक्षेचे बेजोड उदाहरण आहे.