आपल्या किलर डान्स मूव्हसह हॉटनेससाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिच्या मनमोहक स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या फोटोंमधील नोरा फतेहीची बोल्ड स्टाईल चाहत्यांना आवडली आहे.
(Instagram)या फोटोंमध्ये नोरा फतेही आरशासमोर उभी राहून किलर पोज देताना दिसत आहे. तिच्या या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
(Instagram)नोरा फतेहीने या फोटोंमध्ये गडद लाल बॉडीकॉन गाऊन परिधान केला आहे. या बॅकलेस गाऊनमध्ये ती एखाद्या ब्युटी क्वीनसारखी दिसत आहे.
(Instagram)नोरा फतेहीने हिऱ्याचे झुमके, अंगठी आणि किलर फोटो पोजसह तिचा हा लूक पूर्ण केला आहे. नोरा फतेहीच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
(Instagram)