सौदी अरेबिया : सौदी अरेबियामध्येही जनतेला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. या ठिकाणी अनेक अप्रत्यक्ष कर आकारले जातात. या अप्रत्यक्ष करांद्वारेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली जाते. सौदी अरेबियाची गणना समृद्ध अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये केली जाते.
(REUTERS)संयुक्त अरब अमिराती (UAE) : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये लोकांकडून कोणताही इन्कम टॅक्स वसूल केला जात नाही. येथील अर्थव्यवस्था मूल्यवर्धित कर किंवा वस्तू कर यासारख्या अप्रत्यक्ष करांवर अवलंबून आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की युएईची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्थे पैकी एक आहे. युएईच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनवर आयकराचा बोजा लादण्यात आलेला नाही.
(REUTERS)कुवेत : कुवेतमध्ये देखील उत्पन्नावर कुणालाही इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. कुवेतची अर्थव्यवस्था तेलावर आधारित आहे. तेल निर्यातीतून सरकारला भरपूर पैसा मिळतो. त्यामुळे या देशातील लोकांकडून आयकर वसूल करण्याची गरज सरकारला भासत नाही.
(AFP)बहरीन : बहरीनमध्ये देखील आयकर वसूल केला जात नाही. येथील सरकार देखील अप्रत्यक्ष करांवर अर्थव्यवस्था चालवतं. अशा परिस्थितीत, या देशात लहान व्यावसायिक आणि स्टार्टअपमधून नागरिकांना रोजगार मिळतो. जेव्हा लोकांची क्रयशक्ती वाढते तेव्हा अप्रत्यक्ष करांचे संकलन देखील चांगले होते. कारण खरेदीत मोठी वाढ होते.
(AFP)बहामास : पश्चिम गोलार्धातील बहामास हा देश देखील लोकांकडून उत्पन्न कर वसूल करत नाही.
(via REUTERS)ओमान : तेल आणि वायूमुळे ओमानची अर्थव्यवस्था जगातील मजबूत अर्थव्यवस्था झाली आहे. त्यामुळे ओमान आपल्या नागरिकांकडून इन्कम टॅक्स वसूल करत नाही. कतारमध्येही आयकर भरण्याची गरज नाही.
(AP)कतारमध्ये राहणारे लोकही खूप श्रीमंत आहेत. त्यांच्याकडून इन्कम टॅक्स वसूल केला जात नाही. असे अनेक देश आहेत जिथे सुमारे ६० टक्के उत्पन्न कर वसूल केला जातो. यामध्ये फिन लँडचाही समावेश आहे. तथापि, येथील नागरिकांना शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित उत्कृष्ट सुविधा पुरवल्या जातात. जपानमध्ये उत्पन्न कर सुमारे ५५ टक्के आकारला जातो; डेन्मार्क आणि ऑस्ट्रियामध्येही उत्पन्न कर सुमारे ५५ टक्के आहे.