Nilesh Sable Birthday: डॉक्टर निलेश साबळे कसा वळला अभिनयाकडे? वाचा त्याच्या प्रवासाबद्दल...
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nilesh Sable Birthday: डॉक्टर निलेश साबळे कसा वळला अभिनयाकडे? वाचा त्याच्या प्रवासाबद्दल...

Nilesh Sable Birthday: डॉक्टर निलेश साबळे कसा वळला अभिनयाकडे? वाचा त्याच्या प्रवासाबद्दल...

Nilesh Sable Birthday: डॉक्टर निलेश साबळे कसा वळला अभिनयाकडे? वाचा त्याच्या प्रवासाबद्दल...

Jun 30, 2023 05:00 AM IST
  • twitter
  • twitter
Nilesh Sable Birthday: पेशाने डॉक्टर असलेला अभिनेता निलेश साबळे आता मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ म्हटलं की, डोळ्यासमोर येणारा पहिला चेहरा म्हणजे डॉ. निलेश साबळे. डॉक्टर असलेला हा अभिनेता म्हणजेच निलेश साबळे आता मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी ते मनोरंजन विश्वातील डॉक्टरकी असा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. (Photo: @dr.nilesh_sabale_official/IG)
twitterfacebook
share
(1 / 7)

‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमधून स्पर्धक म्हणून सुरु झालेला त्याचा हा प्रवास आज ‘चला हवा येऊ द्या’ सर्वेसर्वा असण्यापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील लोकांना खळखळवून हसवण्याचे काम करणारा हा अभिनेता सर्वांचाच लाडका बनला आहे. (Photo: @dr.nilesh_sabale_official/IG)
twitterfacebook
share
(2 / 7)

अगदी लहानपणापासूनच निलेश साबळेचा अभिनयाकडे कल होता. स्टेजवर काम करणं त्याला खूप आवडायचं. शाळेत असल्यापासूनच तो अनेक कार्यक्रमांत साहभागी व्हायचा. निलेशने खूप शिकून, मेहनत करून डॉक्टरची पदवी मिळवली. आपला मुलगा डॉक्टर झाल्यावर त्याच्या आई-वडिलांनाही खूप अभिमान वाटला होता. (Photo: @dr.nilesh_sabale_official/IG)
twitterfacebook
share
(3 / 7)

पदवी घेतल्यानंतर त्याने वाशीच्या एमजीएम न्यू बॉम्बे या हॉस्पिटलमध्ये सहा महिने नोकरी देखील केली. मात्र, त्याच्यातील अभिनयाचं वेड त्याला शांत बसू देत नव्हतं. याच दरम्यान त्याला ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमाची माहिती मिळाली. या संदर्भात तो आई-वडिलांशी बोलला. (Photo: @dr.nilesh_sabale_official/IG)
twitterfacebook
share
(4 / 7)

डॉक्टर झाला असला, तरी निलेशला मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचे होते. त्याच्या या निर्णयाला पालकांनी होकार दिला. पण, त्यांनी निलेशसमोर एक अट देखील ठेवली. आई-वडील निलेशला म्हणाले की, ‘तू जा पण, जर दोन वर्षात या क्षेत्रात काही करू शकला नाहीस, तर पुन्हा डॉक्टरकीकडे वळायचं.’ (Photo: @dr.nilesh_sabale_official/IG)
twitterfacebook
share
(5 / 7)

मात्र, ती वेळ निलेशवर कधीच आली नाही. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’नंतर निलेश साबळे मनोरंजन क्षेत्रात वेगाने यशस्वी घौडदौड करू लागला. त्याचं यश पाहून आई-वडील देखील आनंदित होते. डॉक्टर निलेश साबळे याने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. इथूनच त्याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला होता. (Photo: @dr.nilesh_sabale_official/IG)
twitterfacebook
share
(6 / 7)

यानंतर त्याने छोट्या पडद्यावरच्या ‘फु बाई फु’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. सूत्रसंचालक म्हणून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आता अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यापर्यंत पोहोचला आहे. (Photo: @dr.nilesh_sabale_official/IG)
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज