Royal Enfield Bullet 350 launched: रॉयल एनफिल्डची धमाकेदार बाईक रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० भारतीय बाजारात दाखल झाली आहे.
(1 / 6)
देशातील आघाडीची बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने त्यांची प्रसिद्ध बाईक बुलेट ३५० चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल देशांतर्गत बाजारात लॉन्च केले आहे.
(2 / 6)
आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या बाईकमध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ही आणखी नव्या ताकदीने पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत १.७४ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली.
(3 / 6)
रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० मध्ये प्रत्येक प्रकारे सौंदर्य आणि यांत्रिक अपडेट्स दिले आहेत. हे कंपनीचे सर्वात परवडणारे मॉडेल आहे. त्याचा इतिहास अनेक दशके जुना आहे.
(4 / 6)
रॉयल एनफील्ड बुलेट ३५० बाईक चेन्नईच्या तामिळनाडू येथे लॉन्च झाली.
(5 / 6)
कंपनी या बाइकमध्ये ३४९ सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, लाँग-स्ट्रोक इंजिन वापरत आहे, जे ६१०० आरपीएम सुमारे १९.९ पीबीएच पॉवर आउटपुट आणि ४,००० आरपीएमवर २७ एनटॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे...
(6 / 6)
रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० मध्ये हेडलाइट्स आणि टेललाइट्सचा नवीन सेट देण्यात आला आहे. कंपनीने या बाइकला पूर्वीसारखा रेट्रो लुक दिला आहे.