बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या कामातून ब्रेक घेऊन दूर सुट्टीवर गेला आहे. तो हिमाचलमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. याची झलक नुकतीच अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओल याने 'गदर' या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता नववर्ष साजरे करण्यासाठी तो हिमाचलला पोहोचला आहे.
सनी देओलने नुकतेच्या त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या या सुट्टीतील ट्रिपचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
यातील काही फोटोंमध्ये अभिनेता बॉनफायरचा आनंद घेताना दिसत आहे. 'चांदणे, बॉनफायर आणि ताऱ्यांनी भरलेले आकाश', असे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.