वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये मिळणार शॉवरची सुविधा; तीन महिन्यात धावणार; पाहा फोटो-new vande bharat sleeper coach unveiled today set for rollout in 3 months see pics ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये मिळणार शॉवरची सुविधा; तीन महिन्यात धावणार; पाहा फोटो

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये मिळणार शॉवरची सुविधा; तीन महिन्यात धावणार; पाहा फोटो

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये मिळणार शॉवरची सुविधा; तीन महिन्यात धावणार; पाहा फोटो

Sep 03, 2024 08:50 AM IST
  • twitter
  • twitter
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत नंतर आता लवकरच भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. या गाडीचा कमाल वेग १६० किलोमीटर असेल. रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, वंदे भारत ट्रेनप्रमाणेच वंदे भारत स्लीपर ट्रेनही स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केली जात आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता आरामात झोपून लांबचा प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली. त्यांच्या हस्ते  रविवारी बेंगळुरूयेथे बीईएमएलच्या सुविधेमध्ये वंदे भारत स्लीपर कोच अनावरण करण्यात आले.  रविवारी त्यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर गाड्या लवकरच ट्रॅकवर धावतील. या रेल्वे गाड्यांची  चाचणीही लवकरच सुरू होणार आहे. आज वंदे भारत एक्सप्रेसचे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. याशिवाय या गाडीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देखील देण्यात आली आहे.   
share
(1 / 8)
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता आरामात झोपून लांबचा प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली. त्यांच्या हस्ते  रविवारी बेंगळुरूयेथे बीईएमएलच्या सुविधेमध्ये वंदे भारत स्लीपर कोच अनावरण करण्यात आले.  रविवारी त्यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर गाड्या लवकरच ट्रॅकवर धावतील. या रेल्वे गाड्यांची  चाचणीही लवकरच सुरू होणार आहे. आज वंदे भारत एक्सप्रेसचे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. याशिवाय या गाडीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देखील देण्यात आली आहे.   (source: DD News)
वैष्णव यांनी रविवारी सांगितले की, वंदे भारत नंतर लवकरच भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवर धावणार आहे.  या गाडीचा  कमाल वेग १६० किमी असेल. वैष्णव म्हणाले की, वंदे भारत ट्रेनप्रमाणेच वंदे भारत स्लीपर ट्रेनही स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच लोको कॅबमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. या सोबतच  लोको पायलट आणि अटेंडंटच्या सुविधांचीही देखील काळजी घेण्यात आली आहे.   
share
(2 / 8)
वैष्णव यांनी रविवारी सांगितले की, वंदे भारत नंतर लवकरच भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवर धावणार आहे.  या गाडीचा  कमाल वेग १६० किमी असेल. वैष्णव म्हणाले की, वंदे भारत ट्रेनप्रमाणेच वंदे भारत स्लीपर ट्रेनही स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच लोको कॅबमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. या सोबतच  लोको पायलट आणि अटेंडंटच्या सुविधांचीही देखील काळजी घेण्यात आली आहे.   (via HT)
स्लीपर वंदे भारत गाड्या ताशी १६०  किमी वेगाने धावणार आहेत. या गाड्यांमध्ये १६ डबे असतील, ज्यात ११  थर्ड एसी, ४  सेकंड एसी आणि १  फर्स्ट एसी असेल. यामध्ये एकावेळी ८२३ प्रवासी प्रवास करू शकतात.
share
(3 / 8)
स्लीपर वंदे भारत गाड्या ताशी १६०  किमी वेगाने धावणार आहेत. या गाड्यांमध्ये १६ डबे असतील, ज्यात ११  थर्ड एसी, ४  सेकंड एसी आणि १  फर्स्ट एसी असेल. यामध्ये एकावेळी ८२३ प्रवासी प्रवास करू शकतात.(via HT)
स्लीपर वंदे भारतमध्ये आधुनिक प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.  याशिवाय यूएसबी चार्जिंग आणि स्पेशल डॉग बॉक्सचाही यात समावेश आहे. ट्रेनमधील प्रत्येक ड्रायव्हिंग ट्रेलर कोचमध्ये (डीटीसी) मोठ्या सामानाची जागा देण्यात आली आहे.
share
(4 / 8)
स्लीपर वंदे भारतमध्ये आधुनिक प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.  याशिवाय यूएसबी चार्जिंग आणि स्पेशल डॉग बॉक्सचाही यात समावेश आहे. ट्रेनमधील प्रत्येक ड्रायव्हिंग ट्रेलर कोचमध्ये (डीटीसी) मोठ्या सामानाची जागा देण्यात आली आहे.(via HT)
रेल्वेमंत्री यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये  सांगितले आहे की, मोठ्या, मध्यम आणि लहान पँट्रीमधून ताजे अन्नही ट्रेनमध्ये  प्रवाशांना दिले जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी फिक्स्ड आणि फोल्डेबल स्नॅक टेबल बसवण्यात आले आहेत.
share
(5 / 8)
रेल्वेमंत्री यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये  सांगितले आहे की, मोठ्या, मध्यम आणि लहान पँट्रीमधून ताजे अन्नही ट्रेनमध्ये  प्रवाशांना दिले जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी फिक्स्ड आणि फोल्डेबल स्नॅक टेबल बसवण्यात आले आहेत.(via HT)
स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मजबूत एरोडायनॅमिक कॅब समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच यामध्ये क्रॅश-बफर्स ​​आणि अँटी क्लायम्बर्स बसवण्यात आले आहेत.
share
(6 / 8)
स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मजबूत एरोडायनॅमिक कॅब समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच यामध्ये क्रॅश-बफर्स ​​आणि अँटी क्लायम्बर्स बसवण्यात आले आहेत.(source: DD News)
HVAC म्हणजेच हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टिममुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे. ट्रेनमध्ये ब्लॅक बॉक्स देखील असेल, जो रिअल-टाइम डेटा गोळा करेल आणि सुरक्षितता वाढवेल.
share
(7 / 8)
HVAC म्हणजेच हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टिममुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे. ट्रेनमध्ये ब्लॅक बॉक्स देखील असेल, जो रिअल-टाइम डेटा गोळा करेल आणि सुरक्षितता वाढवेल.(source: DD News)
लोको पायलटसाठी गाडीमध्ये खास सुविधा देण्यात आल्या आहेत.  वंदे भारत स्लीपर लोको कॅबमध्ये एसी असेल. तसेच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे मंत्र्यांनी असेही सांगितले की ट्रेनमध्ये एर्गोनॉमिकली डिझाइन केलेली ५१  टॉयलेट बसवण्यात येणार आहे.  युरो, ओरिएंटल आणि कॉम्बिनेशन स्टाइल पर्याय असतील. प्रथम श्रेणीतील प्रवाशांना शॉवरची सुविधाही मिळणार आहे.  स्वच्छता राखण्यासाठी बायो-डायजेस्टर असतील आणि प्रत्येक कोचमध्ये ३०  लिटर कचरा कॉम्पॅक्टर बसवण्यात येणार आहेत. 
share
(8 / 8)
लोको पायलटसाठी गाडीमध्ये खास सुविधा देण्यात आल्या आहेत.  वंदे भारत स्लीपर लोको कॅबमध्ये एसी असेल. तसेच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे मंत्र्यांनी असेही सांगितले की ट्रेनमध्ये एर्गोनॉमिकली डिझाइन केलेली ५१  टॉयलेट बसवण्यात येणार आहे.  युरो, ओरिएंटल आणि कॉम्बिनेशन स्टाइल पर्याय असतील. प्रथम श्रेणीतील प्रवाशांना शॉवरची सुविधाही मिळणार आहे.  स्वच्छता राखण्यासाठी बायो-डायजेस्टर असतील आणि प्रत्येक कोचमध्ये ३०  लिटर कचरा कॉम्पॅक्टर बसवण्यात येणार आहेत. 
इतर गॅलरीज