रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआयने फक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमसएस असलेले प्लान लॉन्च केले आहेत. या प्लानबद्दल जाणून घेऊयात.
जिओचा ४५८ रुपयांचा प्रीपेड प्लान: या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यामध्ये, अमर्यादित कॉलिंगसह एकूण १००० एसएमएस उपलब्ध आहेत. या योजनेत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड सारखे फायदे मिळत आहेत.
एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्रीपेड प्लान: या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंगसह एकूण ९०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये मोफत हॅलोट्यून्स आणि अपोलो २४/७ सर्कल सारखे फायदे समाविष्ट आहेत.
व्हीआयचा १ हजार ४६० रुपयांचा प्रीपेड प्लान: या प्लानची वैधता २७० दिवसांची आहे. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंगसह एकूण १०० एसएमएस उपलब्ध आहेत. १०० एसएमएसचा कोटा संपल्यानंतर, प्रत्येक स्थानिक एसएमएससाठी १ रुपये आणि प्रत्येक एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये शुल्क आकारले जाईल.
जिओचा १ हजार ९५८ रुपयांचा प्रीपेड प्लान: या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. यामध्ये, अमर्यादित कॉलिंगसह एकूण ३६०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड सारखे फायदे समाविष्ट आहेत.