काही प्रेक्षकांना ओटीटी प्रदर्शित होणारे चित्रपट पाहण्यासाठी आतुरता असते. आज ९ ऑगस्ट रोजी काही मोठे चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये तीन चित्रपट आणि दोन वेब सीरिजचा समावेश आहे. चला कोणते आहेत ते पाहूया...
अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असणारा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. आज ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.
विक्रांत मेसी, तापसी पन्नू आणि सनी कौशिक यांचा 'फिर आई हसीन दिलरुबा' हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते.
राघव जुयाल, कृतिका कामरा आणि धैर्य करवा यांची वेब सीरिज 'ग्यारह ग्यारह' ही आज ९ ऑगस्ट रोजी रिलिज होत आहे. ही वेब सीरिज झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
संजय दत्त आणि रविना टंडन यांचा 'घुडचढी' हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ९ ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे.