नातेवाईकांना गमावल्यानंतर शोक करणारे प्रवासी : शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला. प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रवाशांची मोठी गर्दी जमली असताना चेंगराचेंगरी झाली.
(PTI)कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करत असतांना नातेवाईक :
या घटनेत १८ जण ठार झाले. मृतांमध्ये सर्वाधिक बिहार येथील रहिवाशी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे नातेवाईक कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करत करत होते. उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हिमांशू उपाध्याय यांनी सांगितले की, पाटणाला जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती. नवी दिल्ली-जम्मू उत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर उभी होती. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली.
(PTI)चेंगराचेंगरीनंतर रेल्वेस्थानकावर भयानक दृश्य :
रेल्वे स्थानकाजवळ चेंगरांचेंगरी झाल्यावर पादचारी पुलावर चप्पलांचा आणि साहित्याचा खच पडला होता. चेंगराचेंगरीचे कारण सांगताना रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, "काही लोक प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ कडे जाणाऱ्या पादचाऱ्या पुलावरून पायऱ्या उतरत असताना ते घसरले आणि इतर लोकांवर पडले."
(HT_PRINT)चेंगराचेंगरीत बाधित झालेल्यांचे कुटुंब चिंतेत आहेत. नवी दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयाच्या शवागाराबाहेरील हे छायाचित्र आहे. सूत्रांनी सांगितले की, गाड्या उशिराने धावत होत्या. याव्यतिरिक्त, दर तासाला १,५०० सामान्य तिकिटे विकली जात होती. यामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नतेवाकांना १० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
(PTI)शवागाराजवळ उभी असलेली रुग्णवाहिका :
हे नवी दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयाच्या शवागाराजवळचे हे छायाचित्र आहे. रुग्णवाहिका तिथे उभी आहे आणि पीडितांचे कुटुंब त्यांच्या प्रियजनांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेत रेल्वे प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
(PTI)नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोलिस तैनात
हे चित्र नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या एस्केलेटरजवळचे आहे जिथे पोलिस उभे आहेत. चेंगराचेंगरीच्या बातमीने प्रवासी चिंतेत आहेत आणि माहिती गोळा करत आहेत. चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, त्यातील दोन सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
(REUTERS)जास्त गर्दीमुळे झाली चेंगराचेंगरी :
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक नरसिंग देव आणि उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार यांचा समावेश आहे. समितीने चौकशी सुरू केली आहे आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचे सर्व व्हिडिओ फुटेज गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
(Hindustan Times)