अनेकांना चहाबरोबर अंडी खायला आवडतात. पण हे खाणे टाळा. कारण कारण उकडलेल्या अंड्यासोबत चहा प्यायलामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. त्यापेक्षा ऑमलेट किंवा ऑमेलट सँडविच हे चहासोबत घ्या.
पावसाळ्यात बहुतांश लोकांना चहासोबत भजी खायला आवडतात. बेसनापासून बनवलेले पकौडे, कटलेट वगैरे, भजी हे अतिशय स्वादिष्ट असतात. पण कधीकधी यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होते.
पाणी हे शरीरातील सर्वात आवश्यक घटकांपैकी एक आहे. पण चहासोबत पाणी प्यायल्याने ही शरीराला गंभीर हानी पोहोचू शकते. त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. अपचन आणि अॅसिडिटीसारख्या समस्या वाढतात.
चहाबरोबर अनेक प्रकारच्या मिठ लावलेले स्नॅक्स खाल्याने प्रतिक्रिया होते. हे स्नॅक्स पचनशक्ती कमकुवत करते. चहामध्ये आढळणारे टॅनिन स्नॅस्कमधील पोषणमूल्य नष्ट करतात. त्यामुळे चहाबरोबर मिठ लावलेले स्नॅस्क खाण्याने शरीराला हानी होते.