नेटफ्लिक्सने नुकत्याच अनेक नव्या वेब सीरिज जाहीर केल्या आहेत. चला या वेब सीरिजचे नाव आणि स्टारकास्टबद्दल जाणून घेऊया…
आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेली एक वेब सीरिज नेटफ्लिक्सवर २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. शाहरुख खानने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, भूमी पेडणेकरची 'द रॉयल्स' ही मालिकाही पुढील वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. या मालिकेत भूमीसह बॉलिवूडमधील ईशान खट्टर, साक्षी तन्वर, झीनत अमान, नोरा फतेही, मिलिंद सोमण, डिनो मोरिया, चंकी पांडे, विहान सामत, काव्या त्रेहान, सुमुखी सुरेश, उदित अरोरा, लिसा मिश्रा आणि ल्यूक केनी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
विक्रमादित्य मोटवणे यांची 'ब्लॅक वॉरंट' ही सीरिज सत्य घटनांवर आधारित आहे. त्याची कथा सुनील गुप्ता आणि सुनेत्रा चौधरी यांच्या "ब्लॅक वॉरंट: कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर" या पुस्तकातून घेतली आहे. त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
'राणा नायडू'चा दुसरा सीझनही २०२५मध्ये येणार आहे. या मालिकेत राणा दग्गुबती आणि व्यंकटेश दग्गुबती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
'हिरामंडी'च्या यशानंतर नेटफ्लिक्सने त्याचा दूसरा भाग जाहीर केला होता. २०२५ मध्ये दुसरा भाग येऊ शकतो आणि त्यात फिल्मी दुनियेत प्रवेश करणाऱ्या गणिकांची कथा दाखवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
दिल्ली क्राईमच्या तिसऱ्या सीझनची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, पुढील वर्षी ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.