(4 / 5)गुलशन झा याला हिरो बनण्याची संधी होती- नेपाळला शेवटच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेसाठी ओटनील बार्टमन हे षटक टाकत होता. या षटकात पहिल्या ५ चेंडूत स्ट्राइकवर असलेल्या गुलशन झा याने ६ धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर ती बीट झाला. चेंडू विकेटकीपरच्या हातात गेला, मात्र असे असतानाही त्यांनी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. तो जवळपास क्रीजवर पोहोचला होता. पण वेळेत बॅट खाली आणता आली नाही आणि तो धावबाद झाला. अशा स्थितीत नेपाळने अवघ्या १ धावेने सामना गमावला. त्याला हिरो बनण्याची चांगली संधी होती.(social media)