Neil Wagner : १२ वर्षांचं शानदार टेस्ट करिअर… प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नसल्यानं घेतली निवृत्ती
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Neil Wagner : १२ वर्षांचं शानदार टेस्ट करिअर… प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नसल्यानं घेतली निवृत्ती

Neil Wagner : १२ वर्षांचं शानदार टेस्ट करिअर… प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नसल्यानं घेतली निवृत्ती

Neil Wagner : १२ वर्षांचं शानदार टेस्ट करिअर… प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नसल्यानं घेतली निवृत्ती

Feb 27, 2024 01:31 PM IST
  • twitter
  • twitter
  • Neil Wagner retirement : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय वॅगनर हा न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज आहे. त्याने याच महिन्यात आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पण त्याआधी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने निवृत्ती जाहीर केली आहे. वॅगनर याने आज (२७ फेब्रुवारी) १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरला पूर्णविराम दिला.
twitterfacebook
share
(1 / 8)
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पण त्याआधी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने निवृत्ती जाहीर केली आहे. वॅगनर याने आज (२७ फेब्रुवारी) १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरला पूर्णविराम दिला.(Getty Images)
मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असलेल्या वॅगनरने २०१२ मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. या काळात त्याने ६४ कसोटी सामन्यात २६० विकेट घेतल्या. वेलिंग्टन येथून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत त्याने निवृत्तीची घोषणा केली.
twitterfacebook
share
(2 / 8)
मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असलेल्या वॅगनरने २०१२ मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. या काळात त्याने ६४ कसोटी सामन्यात २६० विकेट घेतल्या. वेलिंग्टन येथून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत त्याने निवृत्तीची घोषणा केली.(Getty Images)
नील वॅगनरने २०१२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ब्लॅक कॅप्ससाठी शेवटची कसोटी खेळली.
twitterfacebook
share
(3 / 8)
नील वॅगनरने २०१२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ब्लॅक कॅप्ससाठी शेवटची कसोटी खेळली.(Getty Images)
वॅगनरने निवृत्त का गेतील? - नील वॅगनर याला टीम मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले होते, की आता त्याचा यापुढे प्लेइंग इलेव्हनसाठी विचार होणार आहे. यानंतर त्याने संपूर्ण संघाशी आणि हेड कोच गॅरी स्टीड यांच्याशी चर्चा करून निवृत्तीचा निर्णय घेतला.
twitterfacebook
share
(4 / 8)
वॅगनरने निवृत्त का गेतील? - नील वॅगनर याला टीम मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले होते, की आता त्याचा यापुढे प्लेइंग इलेव्हनसाठी विचार होणार आहे. यानंतर त्याने संपूर्ण संघाशी आणि हेड कोच गॅरी स्टीड यांच्याशी चर्चा करून निवृत्तीचा निर्णय घेतला.(Getty Images)
यावेळी तो म्हणाला, "ही वेळ येणार आहे हे मला माहीत होते. गेल्या आठवड्यात भविष्याचा विचार करताना मी निवृत्तीचा निर्णय घेतला. हे कधीच सोपे नसते. हा एक भावनिक प्रसंग आहे."
twitterfacebook
share
(5 / 8)
यावेळी तो म्हणाला, "ही वेळ येणार आहे हे मला माहीत होते. गेल्या आठवड्यात भविष्याचा विचार करताना मी निवृत्तीचा निर्णय घेतला. हे कधीच सोपे नसते. हा एक भावनिक प्रसंग आहे."(Getty Images)
नील वॅगनरचे करिअर -  नील वॅगनरने २००६ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या फॉरमॅटमध्ये त्याने २०५ मॅचमध्ये ८२१ विकेट घेतल्या. त्याच्या नावावर ३६ पाच विकेट्स आणि दोनदा १० विकेट्स आहेत. त्याचवेळी वॅगनरने ११६ लिस्ट ए सामन्यात १७६ विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे वॅगनर हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.
twitterfacebook
share
(6 / 8)
नील वॅगनरचे करिअर -  नील वॅगनरने २००६ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या फॉरमॅटमध्ये त्याने २०५ मॅचमध्ये ८२१ विकेट घेतल्या. त्याच्या नावावर ३६ पाच विकेट्स आणि दोनदा १० विकेट्स आहेत. त्याचवेळी वॅगनरने ११६ लिस्ट ए सामन्यात १७६ विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे वॅगनर हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.(ICC)
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने १३ वेळा ४ विकेट्स आणि ९ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. नील वॅगनरनेही न्यूझीलंडकडून ८७५ धावा केल्या आहेत. नील वॅगनरच्या नावावर कसोटीत अर्धशतकही आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने १३ वेळा ४ विकेट्स आणि ९ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. नील वॅगनरनेही न्यूझीलंडकडून ८७५ धावा केल्या आहेत. नील वॅगनरच्या नावावर कसोटीत अर्धशतकही आहे.(AP)
न्यूझीलंडकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नील वॅगनर पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे सर रिचर्ड हॅडली (४३१), टिम साऊदी (३७६), डॅनियल व्हिट्टोरी (३६१) आणि ट्रेंट बोल्ट (३१७) आहेत. साउथॅम्प्टन येथील भारताविरुद्धच्या WTC फायनलमध्ये नील वॅगनरने तीन विकेट घेतल्या होत्या.
twitterfacebook
share
(8 / 8)
न्यूझीलंडकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नील वॅगनर पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे सर रिचर्ड हॅडली (४३१), टिम साऊदी (३७६), डॅनियल व्हिट्टोरी (३६१) आणि ट्रेंट बोल्ट (३१७) आहेत. साउथॅम्प्टन येथील भारताविरुद्धच्या WTC फायनलमध्ये नील वॅगनरने तीन विकेट घेतल्या होत्या.(Getty Images)
इतर गॅलरीज