भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं हिमानी मोर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. नीरजनं स्वत: या सोहळ्याचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
(X/@Neeraj_chopra1)पॅरिस ऑलिंपिकमध्ये दुसरे पदक जिंकल्यानंतर काही दिवसांतच नीरजनं आपल्या आयुष्यातील हा मोठा निर्णय घेतला.
(X/@Neeraj_chopra1)नीरजचा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीनं झाला. त्यानं आपल्या आईचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. लग्नसमारंभातील एक विधी करतानाचा हा फोटो आहे.
(X/@Neeraj_chopra1)नीरज चोप्रा यानं भारताला दोन ऑलिम्पिक पदकं मिळवून दिली आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यानं रौप्य पदकावर नाव कोरलं आहे.
(HT_PRINT)नीरज चोप्रा हा वैयक्तिक स्पर्धेत दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा स्वातंत्र्योत्तर भारतातील दुसरा पुरुष खेळाडू ठरला आहे.
(PTI)नीरजची पत्नी हिमानी हरियाणातील (Haryana) लारसौली इथली रहिवाशी असून तिचं शालेय शिक्षण पानिपतच्या लिटिल एन्जल्स स्कूलमध्ये झालं आहे. तिनं दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊसमधून राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विषयात पदवी पूर्ण केली. टेनिसपटू म्हणून तिनं फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात अर्धवेळ सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. सध्या ती एमहर्स्ट कॉलेजचा टेनिस संघ सांभाळते. तिथं ती ग्रॅज्युएट असिस्टंट आहे.