(4 / 5)मुंबईतील अणुशक्ती नगर, शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द या भागात मुस्लिमांची मतदारांची मोठी संख्या आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक २००९ आणि २०१९ असे दोनदा निवडणूक जिंकले आहे. फहाद हे समाजवादी पार्टीत सक्रिय आहेत. दिल्लीतील जेएनयूमधील डाव्या विद्यार्थी संघटनांच्या चळवळीतून पुढे आलेल्या अभिनेत्री स्वरा भास्कर या भाजपविरोधी विविध पक्षांच्या कार्यक्रमांत भाग घेत असतात. स्वरा भास्कर यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्या सामील झाल्या होत्या.