मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sameer Wankhede: वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे संघाच्या मुख्यालयात, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण!

Sameer Wankhede: वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे संघाच्या मुख्यालयात, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण!

Mar 20, 2023 05:47 PM IST
  • twitter
  • twitter
Sameer Wankhede In RSS Office : संघ कार्यालयात दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील भेट घेतली आहे. 
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्यामुळं चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आज नागपुरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात हजेरी लावली आहे.
share
(1 / 4)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्यामुळं चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आज नागपुरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात हजेरी लावली आहे.(Narendra Aher (Twitter))
समीर वानखेडे यांनी पत्नी क्रांती रेडकर यांच्यासह संघ मुख्यालयात हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यामुळं आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
share
(2 / 4)
समीर वानखेडे यांनी पत्नी क्रांती रेडकर यांच्यासह संघ मुख्यालयात हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यामुळं आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.(Narendra Aher (Twitter))
महाविकास आघाडी सरकारच्या काळात समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवायांमुळं त्यांची महाराष्ट्रासह देशभरात चर्चा झाली होती. त्यानंतर आता ते ऐन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय इंनिंगला सुरुवात करणार असल्याच्या चर्चा आहे.
share
(3 / 4)
महाविकास आघाडी सरकारच्या काळात समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवायांमुळं त्यांची महाराष्ट्रासह देशभरात चर्चा झाली होती. त्यानंतर आता ते ऐन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय इंनिंगला सुरुवात करणार असल्याच्या चर्चा आहे.(Narendra Aher (Twitter))
संघ कार्यालयात दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील भेट घेतली आहे. याशिवाय वानखेडे यांनी संघाच्या इतर नेत्यांशीही चर्चा केली. मुंबईतील कारकिर्द वादग्रस्त ठरल्यानंतर वानखेडे यांची चेन्नईत बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट संघ कार्यालयात हजेरी लावल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.
share
(4 / 4)
संघ कार्यालयात दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील भेट घेतली आहे. याशिवाय वानखेडे यांनी संघाच्या इतर नेत्यांशीही चर्चा केली. मुंबईतील कारकिर्द वादग्रस्त ठरल्यानंतर वानखेडे यांची चेन्नईत बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट संघ कार्यालयात हजेरी लावल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.(Narendra Aher (Twitter))

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज